🛑 बँक ऑफ इंडियात अनेक पदांवर भरती 🛑

0
46

🛑 बँक ऑफ इंडियात अनेक पदांवर भरती 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 26 सप्टेंबर : ⭕ बँक ऑफ इंडियाने नोकरभरती संदर्भात एक नोटिफिकेशन जारी केले आहे. श्रेणी ४ पर्यंतच्या पातळीवरची वेगवेगळी पदे भरती जाणार आहेत. इच्छुक उमेदवार ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

ही सर्व पदे ऑफिसर लेव्हलची आहेत. बँकेचे अधिकृत संकेतस्थळ bankofindia.co.in वर उमेदवार अर्ज करू शकतील.

परीक्षेसंबंधी महत्त्वाच्या तारखा, पदांची माहिती, पात्रता, वयोमर्यादा आदी माहिती आम्ही या वृत्तात देत आहोत. सोबतच अर्ज करण्यासाठी थेट लिंकही या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे.

➡️ पदांची माहिती :

– क्रेडिट ऑफिसर – ७९ पदे.

– रिस्क मॅनेजर – ९ पदे.

– क्रेडिट अॅनालिस्ट – ६०.

– इकॉनॉमिस्ट / स्टॅटिस्टिशिअन / अन्य – ९६ पदे.

– एकूण पदे – २४४.

➡️ अर्जाचे शुल्क :

– सर्वसाधारण गट – ८५० रुपये.

– एससी/एसटी/पीडब्ल्यूडी प्रवर्ग – १७५ रुपये.

* शुल्क नॉन रिफंडेबल आहे.

➡️ निवड प्रक्रिया :

ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी १५० मिनिटे (अडीच तास) वेळ देण्यात येईल. इंग्लिश लँग्वेज (५० गुण), प्रोफेशनल नॉलेज (७५ गुण) आणि बँकिंग उद्योगाशी निगडीत जनरल अवेअरनेस (५० गुण) असे पेपर असतील. इंग्रजी वगळता अन्य पेपर हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. इंग्रजी भाषा विषयातील गुण मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. नकारात्मक मूल्यांकन असेल.

मुलाखत : परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

➡️ अर्ज कसा करायचा?

बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. अर्ज भरून, ऑनलाइनच शुल्क भरावे. अर्जासोबत फोटो, स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.

बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन CAREER या पर्यायावर क्लिक करून ‘Recruitment of Officers in various streams up to Scale IV- Project No. 2020-21/2 Notice dated 01.09.2020’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नवी विंडो उघडेल. यात APPLY ONLINE या पर्यायावर क्लिक करावे.⭕

Previous article🛑 मराठा आरक्षण आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्या नंतर :- विद्यार्थीनी घातले दंडवत 🛑
Next article🛑 जगप्रसिद्ध Harley-Davidson भारतातून बाहेर; कर्मचाऱ्यांना मोठा फटका 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here