🛑 उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया…..! राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाचे अंमलबजावणी नाही 🛑

0
57

🛑 उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया…..! राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाचे अंमलबजावणी नाही 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.

पंजाब बंदमध्ये 31 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. संसदेत समंत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकामुळे कृषी बाजाराची व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून देखील या विधेयकांना विरोध असल्याचं समोर आलं आहे. ही विधेयक लागू करण्यासाठी ऐवढी घाई कशासाठी, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्राचे कृषी विधेयक शेतक-यांचे फायद्याचे नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्वात यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध आहे. परंतु अंमलबजावणी केली नाही तर काय परिणाम होतील..

न्यायालयात गेले तर काय होईल याबाबत अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले…..⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here