🛑 शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले 🛑

0
46

🛑 शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 25 सप्टेंबर : ⭕ शेअर बाजारात काल मोठी पडझड दिसून आली आहे. निर्देशांक ११०० अंशाने कोसळला आहे. तर निफ्टीतही ३०० अंशाची घसरण झालेली  पाहायला मिळाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. कोरोनाच्या काळात शेअर बाजारात मंदीच दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कंपन्यांना फटकाही बसला आहे. अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

जागतिक बाजारात सुरु झालेल्या पडझ़डीचे परिणाम आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजरात बघायाला मिळाले. सेन्सेक्स जवळपास अकराशे  अंकांनी कोसळून बंद झाला. तर निफ्टीमध्येही ३२६ अंकांनी आपटून बंद झाला. जगभरातल्या प्रामुख्यानं युरोपियन देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे.

त्याचेवळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊ घातलेल्या चुरशीमुळे आशियाई आणि युरोपियन बाजारातील गुंतवणूकदारांचा मिळालेला नफा काढून घेण्याकडे कल आहे. त्यात भारत आणि चीनमध्ये दिवसेंदिवस वाढणारा तणावही काही प्रमाणात बाजाराच्या पडझडीला जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.⭕

Previous article🛑 ‘या’ जिल्ह्यात मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा 🛑
Next article*कळवणच्या बी.एल जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here