🛑 पहिला सीएनजी पंप जेलरोडला 🛑

0
56

🛑 पहिला सीएनजी पंप जेलरोडला 🛑

✍️( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक, 25 सप्टेंबर : ⭕ नाशिक शहरातील पहिला सीएनजी पंप सुरू करण्याचा मान जेलरोडच्या आढाव पेट्रोलपंपाला मिळाल्याची माहिती संचालक ॲड. मुकुंद आढाव यांनी दिली.

भारत पेट्रोलियमचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. राजा, अभियंता स्वप्नील पटेल, विक्री अधिकारी आशुतोष पटवर्धन, महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचे नाशिक-धुळे-बलसाड प्रमुख संदीप श्रीवास्तव, पेट्रोलियम डीलर जयश्री आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पंपाचा प्रारंभ करण्यात आला. वाहतुकीचे टँकर पुरेसे येत नसल्यामुळे सीएनजीचा पुरवठा कमी होत आहे. आढाव पेट्रोलियम येथे केवळ दोन टँकरचा पुरवठा होत असल्याने सकाळी अकरापर्यंत सीएनजी संपते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने त्वरित व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे आढाव यांनी सांगितले.

तिहेरी फायदे सीएनजी हे प्रदूषणविरहित इंधन असून, पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. प्रदूषण कमी होते. वाहनाचा ॲव्हरेज जास्त मिळतो. त्यामुळे नाशिककरांची सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी होती. सीएनजीचा दर प्रतिकिलो ५९.८० रुपये आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८८.२५ रुपये आहे. कमी पैशांत पेट्रोलपेक्षा दुप्पट अॅव्हरेज मिळतो. कारला सीएनजी किट बसविण्यासाठी ३५ ते ४० हजार, तर रिक्षाला २० ते २५ हजार खर्च येतो. आरटीओद्वारे आरसी बुकवर नोंद करून घ्यावी लागते. सध्या मुंबई-पुण्याच्या ग्राहकांचीच सीएनजीसाठी गर्दी होत आहे.⭕

Previous article🛑 मराठा क्रांती मोर्चाचा कांजूरमार्ग येथे जोरदार आंदोलन 🛑
Next article🛑 ‘या’ जिल्ह्यात मोदींचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here