🛑 माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त :- भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित सेवासप्ताह 🛑

0
42

🛑 माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त :- भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित सेवासप्ताह 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बिबवेवाडी:-⭕सेवासप्ताह निमित्त नगरसेवक आणि बिबवेवाडी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. प्रवीणजी चोरबेले यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी या वाचनालयाचे व मातृ-पितृ प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गोरगरीब व गरजू लोकांना हेल्थकेअर चेकिंग, सॅनिटायजर-मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुला-मुलींना नवीन कपडे व फळांचे वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करून पुणे शहर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी अहोरात्र काम करणारे कोरोना वॉरियर्सला यावेळी “व्हिटॅमिन सी” “व्हिटॅमिन डी” मास्क सॅनिटायजर असे प्रत्येकी एक किट नागरिकांना देण्यात आले. चोरबेले यांनी कोरोना काळात केलेल्या सेवाकार्याचे कार्य-अहवालचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी मा. नगरसेविका मनीषा प्रवीण चोरबेले, नगरसेविका मानसीताई देशपांडे, हरीश परदेशी, शेखर पवार, जितेंद्र पोळेकर, राहुल मेहता, हेमंत देशपांडे, राजेंद्र देशपान्डे, अनिल भन्साळी, सुनील मोरे, सुमितजी शाह, किशोर मेघावात, शिवा केंगारे, महेश कांबळे, मयूर कोठारी, अमित मशाले, पियुष चोरबेले आणि आयुष चोरबेले यांच्यासह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here