🛑 *चोवीस तासांत ५० रुग्णांचा मृत्यू* 🛑

0
41

🛑 *चोवीस तासांत ५० रुग्णांचा मृत्यू* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे : पुण्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी करणे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

दिवसागणिक पन्नासहून अधिक मृत्यू होत आहेत. त्याबरोबर बाधितांची संख्यादेखील वाढत आहे. रविवारी दिवसभरात 1 हजार 700 नव्या रुग्णांची भर पडली. तर 1 हजार 545 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले. मागील चोवीस तासांत 50 रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी 12 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

शहरात काल स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 6 हजार 67 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 1 हजार 700 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 31 हजार 781 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 17 हजार 781 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 961 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 464 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 467 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 3 हजार 84 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 10 हजार 916 झाली आहे….⭕

Previous article🛑 बच्चू कडू भाऊंचा रिपोर्ट निगेटिव्ह…..! येऊ दे देवा – चिमुरड्याचे डोळे भरून आले 🛑
Next article🛑 *संभ्रमात राहू नका, लक्षणे असतील तर चाचणी करा……! तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले कळकळीचे आवाहन* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here