🛑 बच्चू कडू भाऊंचा रिपोर्ट निगेटिव्ह…..! येऊ दे देवा – चिमुरड्याचे डोळे भरून आले 🛑

0
51

🛑 बच्चू कडू भाऊंचा रिपोर्ट निगेटिव्ह…..! येऊ दे देवा – चिमुरड्याचे डोळे भरून आले 🛑
✍️ अकोला 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अकोला :⭕ राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना लागण झाली असल्याचे स्पष्ट्र झाले आहे. कालच त्यांनी सोशल मिडियातून या बाबतची माहिती दिली होती. त्यांच्या पत्नी व कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. बच्चू कडू हे आंदोलनातील नेते आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी ते नियमीत आवाज उठवत असतात.

लोकांमध्ये थेट संपर्कात राहिल्याने बच्चू कडू यांच्याबद्दल आपुलकीचं वातावरण आहे. बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत एक मुलगा बच्चू कडू लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. या व्हिडीओत हा मुलगा म्हणतो की, देवा बच्चू कडू भाऊलेबरोबर निगेटिव्ह आणू दे, त्यांना काहीच नको होऊ दे असे म्हणत आहे.

बच्चू कडू यांनी स्वत:हा व्हिडिओ शेअर केला आहे. व म्हटले आहे की, बेटा मला काहीच नाही होणार, औषधासोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो.

खुप मोठा हो सेवा कर अशा शब्दात बच्चू कडूंनी त्या चिमुरड्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. रविवारी सकाळी अकोला येथे कोविड रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले….⭕

Previous article🛑 अखिल भारतीय सेना….! नगरसेवका सौ. गीता गवळी ह्यांनी,आग्रीपाडा येथील बेबी मैदानाची पाहणी केली 🛑
Next article🛑 *चोवीस तासांत ५० रुग्णांचा मृत्यू* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here