*सिएसके संघाचा खेळाडू ब्राव्हो* *दुखापती काही सामने खेळणार नाही.*

0
46

 

*सिएसके संघाचा खेळाडू ब्राव्हो*
*दुखापती काही सामने खेळणार नाही.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

चेन्नई सुपर किंग संघाचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात आणखी काही सामने खेळू शकणार नाही, असे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी स्पष्ट केले.
दुखापतीतून सावरत असलेल्या वेस्ट इंडिजच्या या अनुभवी खेळाडूच्या अनुपस्थितीत तीन वेळचा चॅम्पियन सीएसके संघाने शनिवारी विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करताना गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फ्लेमिंग म्हणाले,’ कुरेनची कामगिरी शानदार झाली.’ कुरेनने प्रभावी मारा करताना ४ षटकांत २८ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला.
नाणेफेक जिंकली असती तर आम्हीसुद्ध प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले असते, असे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने सांगितले. आँस्ट्रेलियाचा हा वेगवान गोलंदाज म्हणाला,’आमची प्रथम गोलंदाजी करण्याची इच्छा होती. रात्री उष्णतामानात फरक पडत असल्यामुळे दवाचा त्रास जाणवतो. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करणे लाभदायक ठरते.
ड्वेन काही सामने बाहेर राहील. कॅरेबियन लीग स्पर्धेदरम्यान अलीकडेच ब्राव्होला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो फायनलमध्ये खेळला नव्हता. ब्राव्होच्या स्थानी खेळत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरेनने ६ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी करीत चेन्नईला लक्ष्य गाठून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Previous article*भिवंडीत कोसळली तिन मजली* *इमारत पाचजणांचा मृत्यू*
Next article*पीएमसी बँक पुन्हा सुरू होणार ,* *गृहराज्यमंत्री सतेज पाटील .*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here