🛑 मुंबईमधे मराठयांचा एल्गार….! जमाव बंदी असतानाही मराठा ठिय्या आंदोलन यशस्वी 🛑

0
185

🛑 मुंबईमधे मराठयांचा एल्गार….! जमाव बंदी असतानाही मराठा ठिय्या आंदोलन यशस्वी 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर मराठा समाजामध्ये संतप्त भावना आहेत. याच भावनांना वाट करून देण्यासाठी आज मुंबईत तब्बल २० ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले . कोरोनाच्या संवेदनशील परिथितीत सोशल डिस्टंसिंग आणि इतर खबरदारी घेत मुंबईत एकाच वेळी तब्बल २० ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले..

मुंबईतील भारतमाता सिनेमा समोर लालबाग, दादर, कुर्ला, वडाळा, लालबाग, चेंबूर, वरळी, गिरगाव, वांद्रे सांताक्रूझ अशा तब्बल वीस ठिकाणी हे आंदोलन करण्यात येतंय. एकाच वेळी २० ठिकाणी आंदोलन झाले मुंबईत सगळीकडे कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे एकाच ठिकाणी आंदोलन न करता २० ठिकाणी हे आंदोलन झाले. कमीत कमी मराठा नागरिकांना एकत्र करून शासनापर्यंत माध्यमांमार्फत मागण्या पोहोचवण्याचा विचार करून, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंगचं पालन करून, संपूर्ण काळजी घेत आंदोलन केलं.

कोरोना संकट काळामुळे कमीत कमी मराठा नागरिकांना मुद्दाम बोलावण्यात आलंय. नाहीतर मुंबईत हजारोंचा जनसमुदाय पाहायला मिळाला असता असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं.

राज्य किंवा केंद्राने काहीही करावं पण आमचं आरक्षण टिकलं पाहिजे असं या आंदोलक नेत्यांचं म्हणणं आहे.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर स्थगिती आलीये. दरम्यान या आंदोलनाची दखल घेऊन मराठा आरक्षण टिकलं नाही तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. आमचा अंत दोन्ही सरकारांनी पाहू नये, लवकरात लवकर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला न्याय आणि त्यांचे हक्क द्यावेत ही मागणी आजच्या या आंदोलनातून केली जातेय…⭕

Previous article*दहिवड परिसरात अतिवष्टीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान*
Next article🛑 *सकल मराठा समाज दक्षिण मुंबई आयोजित मराठा आरक्षण….. संदर्भात सरकारचा निषेध नोंदववित ठिय्या आंदोलन करण्यात आले.* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here