🛑 *जादा भाडे आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर कारवाई*🛑

0
27

 

🛑 *जादा भाडे आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर कारवाई*🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक रुग्णांना रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. मात्र वेळेचा फायदा घेत काही रुग्णवाहिका मालक अव्वाच्या सव्वा भाड्याची रुग्णांच्या नातेवाइकांकडून मागणी करीत आहेत.

प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन आरटीओ प्रशासनाने अशा रुग्णवाहिकांवर कारवाई सुरू केली आहे.

संकट काळात रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे नितांत गरजेचे असते. मात्र रुग्णांची गरज लक्षात घेवून रुग्णांना ने-आण करण्यासाठी ठरवून दिलेल्या दरापेक्षा रुग्णवाहिका मालक अधिकच्या दराची मागणी करीत आहेत. आरटीओच्या भरारी पथकाकडून गुरुवारी दोन रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली होती.

कोरोना काळात रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णवाहिकांची गरज वाढूू लागली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका मालकांकडून नागरिकांची लूट होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार भाडेदर ठरवून दिला आहे. हे दरपत्रक रुग्णवाहिकेमध्ये दर्शनी भागात लावण्यासंबंधीचे आदेशदेखील देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांकडून जादा भाडे आकारणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत आरटीओच्या भरारी पथकाने दोन रुग्णवाहिकांना अटकाव करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई ़केली. यामध्ये मारुती व्हॅन आणि एका कार्डियाक रुग्णवाहिकेचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या आहेत.

रूग्णवाहिकेच्या दराची माहिती

रुग्णवाहिका 25 किमी दर प्रति किमी दर प्रतीक्षा तास
मारूती 500 रूपये 11 रूपये 100 रूपये
टाटा सुमो 600 रूपये 12 रूपये 125 रूपये
टाटा 407 900 रूपये 13 रूपये 150 रूपये…⭕

Previous article🛑 आदित्य ठाकरे म्हणाले होते “केम छो”….! आता वरळीकर म्हणाले ” मनसेत चाललो ” 🛑
Next article🛑 ‘कर्जत स्वच्छता मिशन ‘अभियानांतर्गत कचऱ्यावरील प्रक्रिया आढावा बैठक 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here