🛑 आदित्य ठाकरे म्हणाले होते “केम छो”….! आता वरळीकर म्हणाले ” मनसेत चाललो ” 🛑

0
25

🛑 आदित्य ठाकरे म्हणाले होते “केम छो”….! आता वरळीकर म्हणाले ” मनसेत चाललो ” 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झालेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आता मनसेनं धक्का दिला आहे. वरळी मतदारसंघातील नागरिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे.

वरळी मतदारसंघातील नागरिकांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी हा प्रवेश केला आहे. वरळीमधील काही सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह इतर नागरिकांनी मनसेत प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती संतोष धुरी यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत वरळीच्या जनतेनं निवडून दिले आहे. ते चांगले काम करतील अशी अपेक्षा होती. पण त्यांच्या कामाची प्रचिती इथल्या लोकांना झाली आहे. तुर्तास कोणत्याही निवडणुका नाही. पण मनसे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला आहे’, असंही संतोष धुरी यांनी सांगितलं.

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती.

ठाकरे घराण्यातूनही पहिल्यांदाच कुणी तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या नावाची जेव्हा घोषणा झाली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी वरळीत उमेदवार देण्यास नकार दिला होता….⭕

Previous article🛑 मराठा समाजाला तात्पुरते वटहुकूमाद्वारे आरक्षण संरक्षण शक्य…..! विधी व न्याय विभागाचे मत 🛑
Next article🛑 *जादा भाडे आकारणार्‍या रुग्णवाहिकांवर कारवाई*🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here