🛑 दोन्ही छत्रपतीच्या घराण्यात वाद निर्माण करु नका :- देवेंद्र फडणवीस 🛑

0
25

🛑 दोन्ही छत्रपतीच्या घराण्यात वाद निर्माण करु नका :- देवेंद्र फडणवीस 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे. यावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व कुणी करावं, यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. उदयनराजेंनी मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व करावं, अशी मागणी काही जणांकडून केली जातेय, तर काही जणांकडून खासदार छत्रपती संभाजीराजेंचं नाव पुढं केलं जात आहे.

या दोघांपैकी नेमकं कुणी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

छत्रपतींच्या घराण्यात कुणीही फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. मराठा आरक्षणासाठी दोन्हीही नेते आग्रही आहेत आणि प्रयत्नशीलही आहे. या दोघांनीही या आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात स्थगित करण्यात आलं. मात्र या मुद्द्यावर मला राजकारण करायचं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी आग्रही भूमिका आहे. आमचं सरकार असताना आम्ही ते दिलंही होतं, मात्र आता स्थगिती मिळाली असली तरी आपण सर्वांनी पाठपुरावा करुन ते मिळवून दिलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मी ब्राह्मण असल्यानं मला टीकेचा धनी केलं जात आहे, मी मराठा आरक्षणविरोधी असल्याचं भासवलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच राज्य सरकारनं नुकतीच पोलीस भरतीची घोषणा केली आहे. यावरही फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना पोलीस भरतीची घोषणा करायला नको होती. या भरतीची घोषणा करतेवेळी राज्य सरकारनं विचार केला नाही का? लगेच ती करण्याची घाई नव्हती. सर्वोच्च न्यायालयात काय होतंय हे पाहून एक महिना नंतर भरती झाली तर मोठं नुकसान होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

आता राज्य सरकारनं यावर मार्ग काढायला हवा. मराठा समाजाला आश्वस्त करायला हवं, नाहीतर मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतं असं संभाजीराजे म्हणाले ते खरं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.⭕

Previous article🛑 “संभाजीराजे यांनी पोलिस भरतीला विरोध करु नये….! प्रकाश शेंडगे 🛑
Next article🛑 मराठा समाजाला तात्पुरते वटहुकूमाद्वारे आरक्षण संरक्षण शक्य…..! विधी व न्याय विभागाचे मत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here