*कथा एस.टी.ची* *व्यथा कर्मचाऱ्यांची*

0
24

*कथा एस.टी.ची*
*व्यथा कर्मचाऱ्यांची*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

एस.टी.महामंडाळातील कर्मचाऱ्यांची व्यथा ….
करार पण गेला आयोग पण गेला साधा पगार पण होईना वेळेवर
तुम्हीच सांगा मायबाप सरकार भरोसा ठेवायचा आम्ही कोणावर ?
थकले सारे वीज बिल खोली भाडे पैसा नाही खिशाला
पगार नाही म्हणते बायको मग कामावर जाता कशाला ?
आज होईल उद्या होईल पगार बायकोशी पण किती खोटं बोलायचं
तुम्हीच सांगा मायबाप सरकार नुसत्या भातावर आम्ही किती दिवस जगायचं ?
कधी आम्ही आजारी कायमचे आम्ही कर्जबाजारी खायचे पण झालेत वांदे ,
पैसा नाही जवळ बायको रोज आपटती भांडे .
संपलीये आता सहनशीलता गुदमरतोय आमचा श्वास
जेवतानाही मोजावा लागतो इथे अन्नाचा प्रत्येक घास.
जिवंतपणीच पगार मिळेना इथे वेळेवर,
सरकार म्हणतंय 50 लाख
देतोय तुला मेल्यावर ?
नको तुमचे 50 लाख फक्त दिला शब्द खरा ठरवा.
राज्य शासनात विलीन करून
एस.टी. मात्र आमची जगवा
एस.टी.मात्र आमची जगवा ..
संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टी.कामगारांची एकच मागणी ..

कोरोनाच्या महामारी संकटाने एस.टी.महांमडळ आर्थिक नुकसानीच्या संकटात सापडली आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या लोकवाहीणीला
राज्य शासनाने एस.टी.ला राज्यशासनात विलीनीकरन करून एस.टी.कर्मचाऱ्यांच्या कुठूंबाला आधार देण्याची काळाची गरज आहे.

Previous article*अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत*
Next article🛑 “संभाजीराजे यांनी पोलिस भरतीला विरोध करु नये….! प्रकाश शेंडगे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here