जिल्ह्यात 25 हजार 362 कोविड* *रूग्ण बरे होऊन घरी परतले*

0
29

*जिल्ह्यात 25 हजार 362 कोविड* *रूग्ण बरे होऊन घरी परतले*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यात आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 121 प्राप्त अहवालापैकी 658 निगेटिव्ह तर 463 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 320 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 244 तर 76 पॉझीटिव्ह (85 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1 हजार 79 प्राप्त अहवालापैकी 619 निगेटिव्ह तर 460 पॉझीटिव्ह असे एकूण 999 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 37 हजार 654 पॉझीटिव्हपैकी 25 हजार 362 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 11 हजार 130 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 999 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-30, भुदरगड- 8, चंदगड-3 गडहिंग्लज-21, गगनबावडा- 2, हातकणंगले- 74, कागल-35, करवीर-123, पन्हाळा- 38, राधानगरी- 23, शाहूवाडी-56, शिरोळ- 66, नगरपरिषद क्षेत्र- 117, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 292 व इतर शहरे व राज्य 111 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-682, भुदरगड- 848, चंदगड- 790, गडहिंग्लज- 890, गगनबावडा- 104, हातकणंगले-4248, कागल-1314, करवीर-4237, पन्हाळा- 1402, राधानगरी-1026, शाहूवाडी-956, शिरोळ- 2061, नगरपरिषद क्षेत्र-5960, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 11 हजार 778 असे एकूण 36 हजार 296 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 358 असे मिळून एकूण 37 हजार 654 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 37 हजार 654 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 25 हजार 362 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 162 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 11 हजार 130 इतकी आहे.
तसेच जिल्ह्यात सर्वच ठिकाणी
” *माझे कुठूंब माझी जबाबदारी “*
या अभियानास सुरवात झाली आहे.

Previous article*दुकान व घरफाळा माफ करणेची व्यापारी असोसिएयन ची मागणी*
Next articleमुखेड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पाहणी केली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here