🛑 मुदतवाढीमुळे ४८ हजार विद्यार्थ्यांनी भरले सीईटी अर्ज 🛑

0
26

🛑 मुदतवाढीमुळे ४८ हजार विद्यार्थ्यांनी भरले सीईटी अर्ज 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 18 सप्टेंबर : ⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्यात आली होती. त्याचा फायदा राज्यातील तब्बल ४८हजार ६३४ विद्यार्थ्यांना झाला. विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीचा विचार करता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांनी विविध सामाईक प्रवेश परिक्षांसाठी नव्याने नोंदणी सुरू केली होती.

कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी विविध सामाईक प्रवेश परिक्षांसाठी अर्ज भरू शकले नव्हते. याबद्दल विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेता राज्य सीईटी सेल’ने दोन दिवसांचा कालावधी वाढविला होता. ७ व ८ सप्टेंबर असा हा दोन दिवसीय वाढीव कालावधी होता. या दोन दिवसांत तब्बल ४८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. यामध्ये एम.पी.एड. ३२५, बी.पी.एड. १२६५, बी.एड. १६७१५, एम.एड. ६७७, एल.एल. बी.(तीन वर्ष ) १२०१०, एल.एल. बी.(पाच वर्ष ) ४०६७, बी.एड.-एम.एड. ६४९, बी.ए./बी.एस्सी बी.एड. ११२३, एम.सी.ए. १८९०, बी.एच.एम.सी.टी. ३६१, एम.एच.एम.सी.टी. ३७, एम. आर्किटेक्चर २८७, एम.एच.टी.सी.ई.टी. ९२२८ इतक्या मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली.⭕

Previous article🛑 ५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट🛑
Next article🛑 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here