🛑 सणसरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल 🛑

0
25

🛑 सणसरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

भवानीनगर /पुणे-⭕जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन यांचे बंद आदेश असतानाही व्यापार पेठमधील दुकान सुरू ठेवल्याने भवानीनगर येथील आणि सणसर येथील व्यापाऱ्यांवर इंदापूर तालुक्‍यातील वालचंदनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

इंदापूर तालुक्‍यामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाच्या वतीने दि. 12 ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण इंदापूर तालुक्‍यामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबत भवानीनगर येथील व सणसर येथील डॉक्‍टर आणि मेडिकल या अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे वारंवार करोना याबाबत माहिती सांगत असून देखील काही व्यापारी या नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

याबाबत भवनीनगर व्यापारपेठ येथील सोमनाथ जगतराव कपूर यांचे हार्डवेअर दुकान व सणसर येथील कैलास वसंत खाडे यांचे किराणामाल दुकान उघडे ठेवल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच विना मास्क 92 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून नऊ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे….⭕

Previous article🛑 मराठा आरक्षण…! मगच पोलिस भरती – आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले 🛑
Next article🛑 ५९८ रुपयांचा प्लानः जिओ, एअरटेल आणि VI मध्ये कोणता बेस्ट🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here