🛑 “पोलिस भरती ” म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखेच 🛑

0
29

🛑 “पोलिस भरती ” म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखेच 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठाकरे सरकराने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या बैठकीनंतर दिली. मात्र आता या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारला मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का?, असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत पोलीस भरती करु नये अशी मागणीही संभाजीराजेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.

मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नसताना ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय ऐकून मी दु:खी झालो आहे असं संभाजीराजेंनी सांगितलं.

“सध्या पोलीस भरती करुन घेण्याचं वातावरण नाहीय. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. या मोर्चांना बहुजन समाजाने पाठिंबा दिल्याने ते यशस्वी झाले. आजही मराठा समाज दुखी असून त्यांना आरक्षण कसं मिळणार याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. नोकरभरती करायची असल्याच पुढच्या टप्प्यात करावी त्याबद्दल एवढ्या घाईत निर्णय घेण्याची गरज काय असा प्रश्नही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. “नोकरभरती पुढच्या टप्प्यात करावी. आजच नोकरभरती घ्यायचीय का? तुम्हाला (सरकारला) मराठा समाजाला चिथावणी घ्यायची आहे का? मराठा आरक्षाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकी समाजाचे लोक समजून घेतील.

समाजातील लोकांनी एकत्र राहण्याची गरज असून आता पोलीस भरतीचा निर्णय घेणं म्हणजे मराठी समाजाला चिथावणी देण्यासारखंच आहे,” असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे…⭕

Previous articleकांदा निर्यातबंदीमुळे नेपाळच्या डोळ्यात पाणी , कांद्याचे भाव गगनाला भिडले
Next article🛑 आज इंदोरीकर महाराज खटल्याची पुढील सुनावणी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here