🛑 *म्हणून रियाच्या घरी भर लाॅकडाऊनमध्ये अर्धा किलो गांजा पाठवला…..! समोर आले वेगळेच कारण* 🛑

0
110

🛑 *म्हणून रियाच्या घरी भर लाॅकडाऊनमध्ये अर्धा किलो गांजा पाठवला…..! समोर आले वेगळेच कारण* 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय दररोज नवनवीन खुलासे करत आहे. यामध्ये ड्रग्स कनेक्शन आढळल्यानंतर रिया आणि रिचा भाऊ शोविक यांच्या विरोधात पुरावे सापडल्याने दोघांना अटक केली गेली आहे.

सध्या रिया भायखळा जेलमध्ये आहे.रिपोर्टनुसार पुन्हा एकदा एनसीबीने रिया आणि सुशांतच्या ड्रग्स कनेक्शनबाबत आणखी एक खुलासा केला आहे. एनसीबीला त्यांच्या चौकशीत आढळून आलं आहे की रिया आणि सुशांतने लॉकडाऊन दरम्यान जवळपास अर्धा किलोचा गांजा रियाच्या घरी मागवला होता.

ही लॉकमधील गोष्ट आहे. जेव्हा नुकतेच लॉकडाऊन पडले होते आणि सुशांतला काही वेळ रियाच्या घरी घालवायचा होता. त्यावेळेस सुशांतच्या घरातून रियाच्या घरी एक गांजाचे पाकीट पाठवण्यात आले होते.

एनसीबीला तपासात असे आढळून आले आहे की, हे पाकीट दीपेश सावंतने एका कुरिअर बॉयला दिले होते.
हे कुरिअर रियाच्या घरी शोविक चक्रवर्तीने घेतले होते. यामध्ये अर्धा किलो गांजा होता. गांजाचे पॅकेट पकडले जाऊ नये म्हणून त्या कुरिअरमध्ये काही घरचे समान टाकण्यात आले होते. हे कुरिअर एप्रिल महिन्याच्या मधल्या काही दिवसांत पाठवले होते.कुरिअर बॉयने सुशांतचा हेल्पर दीपेश सावंत आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांना ओळखले आहे.

इतकेच नाही तर कुरिअर बॉयचे आणि शोविक चक्रवर्तीचे फोन डिटेल्स मॅच झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लॉकडाऊनमध्ये रियाच्या घरी जाणार होता. त्यामुळे तिथे गांजाचे पॅकेट पाठवले गेले होते……⭕

Previous article🛑 *बैलाच्या जागी मुलाला जुंपल्याने द्रवली संवेदनशील मने, आणि मिळाली ही लाखमोलाची मदत* 🛑
Next article*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here