🛑 पुण्यात मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न 🛑

0
22

🛑 पुण्यात मराठा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असताना हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली, राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडले, असा आरोप मराठा समाजाने केला असून सरकारचा निषेध करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मात्र, १७ सप्टेंबर रोजी पुण्यात आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत.

सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडले आहे का का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मराठा समाज आता राज्यात आक्रमक होत असून अनेक ठिकाणी निदर्शने व आंदोलने केली जात आहे, तर कोल्हापुरात गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मराठा संघटना यात सामील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात आक्रमक भुमिका घेतली आहे. पुण्यात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. आमचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात कार्यकर्ते एकत्र येऊन १७ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत होते. ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील या नोटीशीतून बजावण्यात आले होते….⭕

Previous article🛑 महाराष्ट्र मराठीच हवी – ठाकरे सरकार ५५ वर्षापुर्वीचा कायदा बदलणार 🛑
Next article🛑 *लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबताच झाला घात… पुणे जिल्ह्यातील घटना* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here