🛑 मराठा आरक्षणावर केंद्रनेही भुमिका न्यायालयात मांडवी – राजीव सातव 🛑

0
80

🛑 मराठा आरक्षणावर केंद्रनेही भुमिका न्यायालयात मांडवी – राजीव सातव 🛑
✍️ हिंगोली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

हिंगोली -⭕ मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत असून, यावर शून्य प्रहरात खा.राजीव सातव यांनी लक्ष वेधत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यासोबतच केंद्रानेही आपली भूमिका न्यायालयात मांडावी, अशी मागणी केली.

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच खा.राजीव सातव यांनी राज्यसभेत केली. ते म्हणाले, मराठा समाजाला मोठ्या संघर्षानंतर आरक्षण मिळाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला आहे, त्यामुळे आरक्षण धोक्यात सापडल्याची स्थिती सर्वांसमोर आहे.

यापूर्वी आरक्षणावर सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने आपली बाजू मांडली नव्हती.

केवळ राज्य सरकारने बाजू मांडली. मात्र येणाऱ्या काळात सुप्रीमी कोर्टात सुरू असलेल्‍या सुनावणीत राज्यासह केंद्र सरकारनेही आरक्षणाच्या बाजूने मत मांडावे.

जेणेकरून हे आरक्षण कायम राहील, अशी मागणी त्‍यांनी केली.⭕

Previous article🛑 “मराठा क्रांती मोर्चाचा” राज्यात एकाच दिवशी आंदोलन नाही 🛑
Next article🛑 महाराष्ट्र मराठीच हवी – ठाकरे सरकार ५५ वर्षापुर्वीचा कायदा बदलणार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here