*एस.टी.महामंडाळात मिळणार अनुकंपतत्वार नोकरी*

0
20

*एस.टी.महामंडाळात मिळणार अनुकंपतत्वार नोकरी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

मुंबईसह राज्यातील प्रवाशांना एसटी वाहतूक सेवा पुरवत आहे. मात्र, सध्या राज्यावर कोरोनाचा संकट असून, या कोरोनानं एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही टार्गेट केलं. परंतु, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशी सामान्य प्रवाशांना वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचारी आपला जीव धोक्यात वाहतूक सेवा देत आहेत. त्यामुळं या सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावरही नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय याआधी मुंबईतील बेस्ट उपक्रमानेही घेतला आहे. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा शासनाचा नियम आहे.
याची अंमलबजावणी एसटीकडून केली जात आहे. आतापर्यंत एसटीत ३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यातील पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आर्थिक मदतीसाठी दावा केला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकं पातत्त्वावर नोकरी देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. आर्थिक मदतीचा लाभ केवळ कर्तव्यावर असताना करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळेल, असेही चन्ने यांनी स्पष्ट केले.

Previous article*ए.टी.कामगारांना मिळणार पन्नास लाखांचा विमा कवच*
Next article*छावा जनक्रांती संघटनेचा मंत्रालयात दणका धडक*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here