🛑 “माझे कुटुंब ” माझी जबाबदारी मोहीम महापालिका क्षेत्रात सुरू 🛑

0
22

🛑 “माझे कुटुंब ” माझी जबाबदारी मोहीम महापालिका क्षेत्रात सुरू 🛑
✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे मुंबई ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ ‘कोविड – १९’ या साथ रोगाला आळा घालण्‍यासाठी राज्‍यभरात राबविण्‍यात येणारी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्‍यास आजपासून प्रारंभ झाला आहे. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात व्‍यापकपणे व सर्व स्‍तरावर ही मोहीम राबविली जाणार असून या अंतर्गत मुंबईतील सुमारे ४० लाख घरांशी संपर्क केला जाणार आहे. तसेच या मोहिमेंतर्गत कोविड विषयक घ्‍यावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती देखील घरोघर जाऊन देण्‍यात येणार असून त्‍यासोबतच एक माहिती पत्रकही घरोघरी देण्‍यात येणार आहे.

या अनुषंगाने प्राथमिक वैद्यकीय पडताळणी करणे, कुटुंबातील सदस्‍यांची प्राथमिक माहिती घेणे आणि कोविड विषयक प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती देणे, यासाठी आपल्‍या घरी येणाऱया महापालिकेच्‍या चमुला आवश्‍यक ते सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे करण्‍यात आले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या दृष्‍टीने महापालिका आयुक्‍त श्री. इकबाल सिंह चहल यांच्‍या मार्गदर्शनात आज एका वि‍शेष बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्‍तांनी महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांमध्‍ये मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यासाठी सूक्ष्‍मस्‍तरीय नियोजन करण्‍याचे निर्देश यापूर्वीच दिले होते. यानुसार आजच्‍या बैठकीदरम्‍यान महापालिका आयुक्‍तांनी विभाग स्‍तरावर व विविध खात्‍यांच्‍या स्‍तरावर करण्‍यात येत असलेल्‍या नियोजनाचा सविस्‍तर आढावा घेतला. यामध्‍ये प्रामुख्‍याने मनुष्‍यबळ व्‍यवस्‍थापन, प्रशिक्षण, कोविडविषयक पडताळणी, सर्वेक्षणातून उपलब्‍ध होणाऱया माहितीचे विश्‍लेषण इत्‍यादी बाबींच्‍या नियोजनाचा आढावा घेण्‍यात आला.

तसेच या मोहिमेच्‍या अनुषंगाने करण्‍यात येणाऱया जनजागृतीविषयक बाबींचाही आढावा महापालिका आयुक्‍तांनी घेतला….⭕

Previous article🛑 जम्बो रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज; उपचारातही पारदर्शकता ! 🛑
Next articleनांदेड जिल्हा शिक्षण विभागाची आढावा बैठक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here