🛑 जम्बो रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज; उपचारातही पारदर्शकता ! 🛑

0
23

🛑 जम्बो रुग्णालयात माहिती व्यवस्थापन प्रणाली सज्ज; उपचारातही पारदर्शकता ! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕जम्बो कोविड सेंटर येथे रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली स्थापित करून त्याचा उपयोग करण्यात येत आहे. आज माझ्या हस्ते या प्रणालीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जम्बो सेंटरचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पुणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.

या प्रणालीद्वारे रुग्णांच्या डिस्चार्जपर्यंतच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. या व्यवस्थेसाठी कमांड रुम तयार केली आहे. यापूर्वी अशी माहिती उपलब्ध होत नव्हती, त्यामुळे ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. आयसीयू आणि इतर वॉर्डमधील रुग्णांवर प्रत्यक्ष होणारे उपचार, त्यांच्या प्रकृतीची स्थिती यांची लाईव्ह माहिती येथील स्क्रीनवर डॉक्टरांना व व्यवस्थापनाला पाहता येईल. तसेच, रुग्णांचा तपशील अंतर्गत डॅशबोर्डवर अपडेट केला जाणार आहे….⭕

Previous article🛑 महानगरपालिका कडुन २ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी – कंगणा राणौत 🛑
Next article🛑 “माझे कुटुंब ” माझी जबाबदारी मोहीम महापालिका क्षेत्रात सुरू 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here