🛑 मराठा आरक्षणासाठी कराड मधे फुंकले रणशिंग 🛑

0
45

🛑 मराठा आरक्षणासाठी कराड मधे फुंकले रणशिंग 🛑
✍️ कराड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कऱ्हाड :⭕ एक मराठा… लाख मराठा…, आरक्षण आमच्या हक्काचे… नाही कुणाच्या बापाचे…, कोण म्हणतो देत नाय… घेतल्याशिवाय रहात नाय….. 👊✊

यास विविध घोषणा देत आज मराठा समाज रस्त्यावर उतरला. कऱ्हाड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मराठा समाजाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याची शपथ घेऊन प्रसंगी गमिनी कावा करुन जीवाची बाजीही लावु… असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हा आमचा जन्मसिध्द हक्क असून ते आम्ही मिळवणारचं या इराद्याने पेटून उठलेले मराठा समाज बांधवांनी आज कऱ्हाडातील येथील शिवतीर्थ दत्त चौकात आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मराठा समाजाच्यावतीने तुतारीच्या ललकारीत जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याची शपथ घेऊन प्रसंगी गमिनी कावा करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलना दरम्यान वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
रस्त्यावर उतरल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही.

त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचे सांगत समाज बांधवांनी मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा यासाठी संसदेत मराठा समाजाच्या खासदारांनी दबाव आणावा, राज्यातील 165 मराठा समाजातील आमदारांनी तातडीने पावले उचलावी अशीही मागणी करण्यात आली.

निकालाने मराठा समाजावर अन्याय केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आऱक्षण मिळत नाही. तोपर्यंत शांत न बसता संघर्षाचा भूमिका घेवुन लढा देण्याचा निर्धार मराठा समाजाने केला.

वेळ पडल्यास जीवाची बाजु लावु, मात्र आम्ही मागे हटणार नाही, जी लढाई होईल. ती आर या पार होईल. येणाऱ्या पुढील काळात टप्याटप्याने आंदोलनाचा भूमिका घेतली जाईल. प्रसंगी आक्रमक आंदोलन तर काही वेळेला गमिनी कावा करुन आंदोलन केले जाईल.

त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेवुन तातडीने आरक्षणासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली….⭕

Previous article🛑 शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात….! मराठा आरक्षणावर का नाही ..? 🛑
Next article🛑 *भूकंपग्रस्त भागात भूकंपरोधक घरांची निर्मिती करणार……! पालकमंत्री दादाजी भुसे* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here