🛑 मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद 🛑

0
32

🛑 मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕ मराठा आरक्षणाबाबतचे पडसाद आज राज्यसभेत दिसून आलेत. काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी ‘झिरो तासां’च्या प्रश्नउत्तरात मराठा आरक्षणबाबत नोटीस दिली. सातव यांनी या नोटीशीद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. तसेच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला.

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र वटहुकूम काढावा, अशीही मागणी छत्रपती संभाजीराजे आणि राजीव सातव यांनी राज्यसभेत केली.

त्यावेळी मराठा आरक्षण प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद उमटल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा निर्णय घेतल्याने मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावरुन संसदेत चर्चा करण्यात यावी यासाठी राज्यसभा खासदार राजीव सातव यांनी चर्चेची नोटीस दिली.

त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात शून्य प्रहरात चर्चा करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव आणि छत्रपती संभाजीराजे यांनी केली….⭕

Previous article*मातेसह नवजात बालकाला कोरोनाच्या विळख्यातून वाचवण्यात यश*
Next article🛑 शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात….! मराठा आरक्षणावर का नाही ..? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here