*आमच्या दैवता विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही,* *मंत्री अनिल परब *

0
23

*आमच्या दैवता विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही,*
*मंत्री अनिल परब *कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

आमचे दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. आमच्या दैवताबद्दल कोणीही काहीही बोलले तर आम्ही ऐकून घेणार नाही असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांनी खासगी चॅनेलशी बोलताना आज दिला.
नौदल अधिकाऱ्यांला झालेल्या मारहाणीच्या संदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, ही शिवसैनिकांची उस्त्फुर्त प्रतिक्रीया होती.
नौदल अधिकारी आहे म्हणून संयम तोडण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही त्यांनी केला. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. दैवताला कोणी काही बोलले आणि आम्ही सत्तेत बसलो आहे म्हणून बोलायचे नाही का असा प्रतिप्रश्नही केला.
कंगना राणावतने मुंबईच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने तिथेच रहावे. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपले बस्तान तिने उचलावे हेच योग्य ठरेल. कंगना राणावतच्या आँफीसच्या बेकायदा बांधकामाकर पालिकेने केलेली कारवाई व राज्यपालांची घेतलेली भेट यावरील प्रश्नाला उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, महापालिकेने बेकायदा कामावर बांधकामावर कारवाई केली. राज्यपाल त्यांना केळ देत असतील तर राज्यपालांनी इतरांनाही भेटले पाहिजे. विचारपूस केली पाहिजे.

Previous article*भाजपमध्ये आन्याय होत असल्याने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*
Next article*गरीबांना गँस पेक्षा ही स्वस्त पर्याय *उपलब्ध करून देणार ,* *उर्जामंत्री आर.के.सिंह.*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here