🛑 ठाणे मराठा क्रांती मोर्चाची…! मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न 🛑 ✍️ ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) ठाणे :⭕आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ची मराठा आरक्षण संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अनेक मराठे सर्व सोसिअल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून उपस्थित होते. सर्वानी सुप्रीम कोर्टच्या आरक्षण स्थगिती निर्णयावर चिंता व्यक्त केली. तसेच जजमेंट कॉपी यायच्या आधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऍडमिशन रद्द केले त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्हीचा सुध्दा निषेध व्यक्त केला की ते सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडले. आजच्या बैठकीत ठराव संपन्न झाला की राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा व मराठा आरक्षण ही सरक्षित करावे, मुलांचे चालू शैक्षणिक वर्षे व नोकरी संदर्भातील आरक्षणला कायद्याच्या चौकटीत बसून संरक्षण द्यावे, अन्यथा ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल. तसेच 48 खासदारांना सुद्धा ठाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्र लिहण्यात येणार आहे की संसदेत सुद्धा मराठा आरक्षण बाबतीत केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे. बैठकीला आलेल्या सर्वांचे समनव्यक रमेश आंब्रे यांनी आभार मानले…⭕

0
24

🛑 ठाणे मराठा क्रांती मोर्चाची…! मराठा आरक्षण संदर्भात बैठक संपन्न 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

ठाणे :⭕आज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ची मराठा आरक्षण संदर्भात बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. कोरोनाचा काळ असताना सुद्धा अनेक मराठे सर्व सोसिअल डिस्टन्स चे नियमाचे पालन करून उपस्थित होते.

सर्वानी सुप्रीम कोर्टच्या आरक्षण स्थगिती निर्णयावर चिंता व्यक्त केली. तसेच जजमेंट कॉपी यायच्या आधी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऍडमिशन रद्द केले त्यावर सगळ्यांनी निषेध व्यक्त केला.

तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्हीचा सुध्दा निषेध व्यक्त केला की ते सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला कमी पडले.

आजच्या बैठकीत ठराव संपन्न झाला की राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढावा व मराठा आरक्षण ही सरक्षित करावे, मुलांचे चालू शैक्षणिक वर्षे व नोकरी संदर्भातील आरक्षणला कायद्याच्या चौकटीत बसून संरक्षण द्यावे, अन्यथा ठाणे मराठा क्रांती मोर्चा हा आंदोलनाच्या भूमिकेत उतरेल.

तसेच 48 खासदारांना सुद्धा ठाणे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्र लिहण्यात येणार आहे की संसदेत सुद्धा मराठा आरक्षण बाबतीत केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे.

बैठकीला आलेल्या सर्वांचे समनव्यक रमेश आंब्रे यांनी आभार मानले…⭕

Previous article🛑 मराठा बांधवांनी……! आंदोलन करु नये…! सरकार तुमच्यासोबत आहे -: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 🛑
Next articleआमदार दिलीप बोरसेंची नागरिकांनी घेतली भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here