🛑 मराठा बांधवांनी……! आंदोलन करु नये…! सरकार तुमच्यासोबत आहे -: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 🛑

0
26

🛑 मराठा बांधवांनी……! आंदोलन करु नये…! सरकार तुमच्यासोबत आहे -: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई -:⭕ मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टिका करण्यात येत होती.याच दरम्यान,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज प्रथमच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आज मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले की,मराठा बंधु-भगिनींनो, तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे.जेष्ठ विधीज्ञांसोबत आम्ही चर्चा करत आहोत.

तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात..? सरकार तर तुमच्यासोबतच आहे.आंदोलनांची आवश्यकता नाहीये,कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आपण एकत्र लढलो.सर्वपक्षीय एकत्र लढलो.पूर्वीच्या सरकारचे कोणतेही वकील बदलले नाहीत,उलट अधिक वकील दिले आहेत.

कोर्टात आर्ग्युमेन्ट करायला आपण कमी पडलो नाहीयोत,असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हणाले….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here