🛑 गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात 🛑

0
26

🛑 गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 14 सप्टेंबर : ⭕ इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘गेट’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, असे यंदाची परीक्षा आयोजक संस्था आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले.

या परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, म्रदास आणि रुरकी या संस्थांच्या वतीने आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

ज्या विद्यार्थांना शिक्षण मंत्रालयाकडून मास्टर्स आणि डॉक्टरल पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य हवे असते आणि अन्य शासकीय शिष्यवृत्ती हवी असते त्यांनी गेट परीक्षेत पात्र व्हावे लागते. काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमधील नोकरीसाठी देखील गेट परीक्षेचा स्कोर ग्राह्य धरला जातो. हा स्कोर तीन वर्षांकरिता वैध असतो.

➡️ गेट 2021: काही महत्त्वाच्या तारखा :-

1) अर्ज करण्याची अखेरची तारीख – ३० सप्टेंबर २०२०.

2) विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२०.

3) अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१.

4) गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१.

5) निकाल – २२ मार्च २०२१.⭕

Previous article🛑 नवीन नियमांनंतर Mutual Fund मध्ये गुंतवलेल्या तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? 🛑
Next article*वडगांव कोविड सेंटर सर्वसामान्यांचा आधार*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here