🛑 कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक….! मराठा आरक्षण 🛑

0
41

🛑 कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक….! मराठा आरक्षण 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कोल्हापूर :🛑 मराठा समाजाला न्यायालयाच्या निकषावर टिकणारे आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरात विविध मराठा समाजाच्या संघटना रविवारी रस्त्यावर उतरल्या. क्षत्रिय मराठा समाजासह विविध संघटनांनी १२ वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

तर मराठा मावळा ग्रुपने राज्य सरकार विरोधात मिरजकर तिकटी येथे निदर्शने केली. तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मसुदा कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळी निश्चित करण्यात आला होता. तत्पूर्वी आरक्षण मागणीचा मोर्चा आणि दसरा चौकात महिनाभर ठिय्या आंदोलन केले होते. मराठा समाजाला भाजप सरकारने नोकरी आणि शिक्षणात आरक्षण जाहीर केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण प्रक्रियेला स्थगिती दिली.

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याची भावना समाजाची आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने जोर लागली आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

‘आरक्षण आमच्या हक्काचे…’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. महामार्ग रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, मावळा ग्रुपच्या सदस्यांनी ठिय्या आंदोलन करत आरक्षणाची मागणी लावून धरली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे…⭕

Previous article🛑 *या खाजगी बँकेत नोकरी करण्याची संधी….! मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या 25000 करणार* 🛑
Next article🛑 मराठा आमदारांना आरक्षण नकोय….! प्रकाश आंबेडकर 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here