ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा!, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या व जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम

0
68

ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा!, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या व जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दी. १३ – कोरोना रुग्णांसाठीच्या आॅक्सिजन सिलिंडरचा सर्वत्र तुटवडा भासत असल्याचे चित्र असून त्याअभावी रुग्ण दगावत असल्याच्या तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वेळेवर आॅक्सिजन मिळावा तसेच आॅक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा यासाठी याच्या नियंत्रणाकरिता जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलिंंडर आणि २०० जम्बो सिलिंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. टोपे यांनी राष्ट्रीय आॅक्सिजन उत्पादक संघटनेच्या अध्यक्षांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून राज्याला पुरेशा प्रमाणात आॅक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सूचना दिल्या. राज्याची आॅक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात आॅक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाइप सिलिंडर – १५४७, ड्युरा सिलिंडर – २३०, लिक्विड क्रायोजनिक आॅक्सिजन टँक १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरू असल्याचा दावा सरकारने केला आहे.
जिल्हावार नोडल अधिकारी नेमले आहेत. राज्यस्तरावर अन्न व औषध प्रशासनामार्फत कंट्रोल रूम सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९२३६४ असून टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ असा आहे.
क्रायो आॅक्सिजन टँक
शंभर किंवा त्याहून अधिक खाटा असलेल्या सार्वजनिक रुग्णालयांनी निधी प्राप्त करून क्रायो आॅक्सिजन टँक स्थापन करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Previous articleदेगलूर् उपजिल्हा रुग्णालयात असुविधांचे कळस रुग्णांचे बेहाल, जुलै महिन्या पासून व्हेंटिलेटर धूळखात पडून
Next article*परिवहन मंत्री सतेज पाटील यांना एस. टी.कर्मचाऱ्यांचे निवेदन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here