*दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक करवाई करा* *बहुजन वंचित युवक आघाडी*

0
26

*दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक करवाई करा*
*बहुजन वंचित युवक आघाडी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर परिसरातील एका युवतीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला मात्र तिची पोलिसांनी सविस्तरपणे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी आरोपीना फायदा होईल अशा पद्धतीने गुन्हा नोंद करून घेतला.
पिडीत युवतीला न्याय नाही मिळाला तर गृहराज्यमंत्र्याच्या दारात लाँगमार्च काढण्याचा इशारा बहुजन वंचित युवक आघाडीने दिला आहे.
दि.६ सप्टेंबर रोजी वारणानगर परिसरातील युवतीवर लैंगिक अत्याचार करून पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.
या बाबत पेठ वडगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस कर्मचारी अमरसिंह पावरा यांनी सदर घटणेत जाणीवपूर्वक बदल केला आहे. मात्र तिला धमकी दिल्या बाबत जबाब नोंदवला गेला आहे.
पिडीत युवतीला आणि नातेवाईकांना ताटकळत ठेऊन फिर्याद देण्यापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आसल्याचा आरोप प्रा.शरद कांबळे यांनी केला आहे.
या लैंगिक अत्याचाराबाबत पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांना सत्य घटना सांगितले असता सदर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पिडीत युवतीलाच दोषी ठरवून पोलीस कर्मचारी पावरा यांना पाठीशी घातले आहे.
सदर घटणेबाबत पोलिस कर्मचारी अमरसिंह पावरा व पो.नि. प्रदीप काळे या दोघांना निलंबित करण्याची मागणी बहुजन वंचित युवक आघाडीने पत्रकार परिषदेत केली आहे. पिडीत युवतीला न्याय नाही मिळाला तर गृहराज्य मंत्र्याच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा बहुजन वंचित युवक आघाडीच्या वतीने दिला आहे.
यावेळी प्राध्यापक शरद कांबळे , विकास कांबळे , मिलींद सनदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous article🛑 मराठा आरक्षण स्थगितीसाठी पुन्हा….! सर्वोच्च न्यायालयात अर्ज 🛑
Next article*पेठ वडगांव शहराचे माजी.उपनगराध्यक्ष यांना पितृ शोक*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here