🛑 मराठा आरक्षण स्थगितीसाठी पुन्हा….! सर्वोच्च न्यायालयात अर्ज 🛑

0
30

🛑 मराठा आरक्षण स्थगितीसाठी पुन्हा….! सर्वोच्च न्यायालयात अर्ज 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕ मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीबाबत अॅड. विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठानं इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेऊन ही स्थगिती दिली आहे.

मात्र तो खटला मागासवर्गीय आरक्षणाबाबत होता, तर मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा नवा प्रवर्ग तयार करून देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला असून राज्य सरकारनेही ताबडतोब अर्ज दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा अरक्षणाची योग्य बाजू मांडली नसल्यामुळे मराठा आरक्षणाला खीळ बसली आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पु्न्हा एकदा केली आहे.

मराठा आरक्षणासाठी यवतमाळच्या दिग्रसमध्ये मराठा क्रांती युवक संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. मराठा आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाली ती विद्यमान राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच असा आरोप करत, मराठा क्रांती युवक संघटनेनं सरकारविरुद्ध घोषणा दिल्या.

यापूर्वी, सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर विद्यमान सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली..⭕

Previous article🛑आरक्षणाचा प्रश्न सोडवा नाहीतर….! मराठा समाजातील तरुण नक्षलवादाकडे वळतील 🛑
Next article*दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक करवाई करा* *बहुजन वंचित युवक आघाडी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here