🛑 महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सुरू होणार शाळा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती 🛑

0
21

🛑 महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सुरू होणार शाळा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 13 सप्टेंबर : ⭕ कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतानाच देशभरातील शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली. मात्र एकीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत असताना शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षण विभागाने संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली. या बैठकीत संस्थाचालकांनी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.

संस्थाचालकांच्या विरोधानंतर राज्यातील शाळा 21 तारखेला उघडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दिवाळीनंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या बैठकीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्यासह आणखी काही पदाधिकारी उपस्थित होते.

देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच काही दिवसांपूर्वी केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल.⭕

Previous article🛑 फ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान 🛑
Next article🛑 आधार कार्ड लिंकसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here