🛑 फ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान 🛑

0
23

🛑 फ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 13 सप्टेंबर : ⭕ फ्लिपकार्ट सेल ची सुरुवात १८ सप्टेंबर पासून होणार आहे. ही सेल २० सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. ३ दिवसांसाठीच्या या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाईट्सवर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्स दिले जाणार आहेत. मोबाइल, टॅबलेट, टीव्ही, अॅक्सेसरी आणि अन्य दुसरे इलेक्ट्रॉनिक सामान या सेलमध्ये खरेदी करता येवू शकतील. फ्लिपकार्ट १ रुपयात आपली मनपसंत सामान प्री बुक करण्याची ऑफर देत आहे. ही प्री बुक ऑफर १५ सप्टेंबर आणि १६ सप्टेंबर रोजी साठी आहे. एसबीआय कार्ड युजर्संना ईएमआय आणि कार्ड्स द्वारे ट्रान्झॅक्शनवर सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टने आता पर्यंत बिग सेविंग डेज सेलमध्ये उपलब्ध होणाऱ्या उत्पादनाचा खुलासा केला नाही. परंतु, मोबाइल फोन्स आणि टॅबलेट्स ची माहिती दिली आहे. नो कॉस्ट ईएमआय, कार्डलेस, क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सोबत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टीव्ही आणि अप्लायन्स खरेदीसाठी इच्छूक ग्राहकांसाठी कंपनी नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सोबत कंपलीट अप्लायन्स प्रोटेक्शन ऑफर करीत आहे.

बिग सेविंग डेज सेल मध्ये ३ कोटी हून जास्त इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीज ला विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. अॅक्सेसरीज मध्ये फ्लिपकार्ट्स स्मार्टबॉय प्रोडक्ट्स यासारखे वायरलेस माउस, की बोर्ड्स, पॉवर बँक्स, हेडफोन, केबलवर आकर्षिक डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एसबीआय कार्ड युजर्संना क्रे़डिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.

याशिवाय फ्लिपकार्ट १ रुपयात प्रोडक्टला प्री बुक करण्यासोबत गारंटिड स्टॉक मिळण्याची ऑफर देत आहे. प्री बुक करण्यासाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या होमपेजवर प्री बुक स्टोर वर जावून आपली ऑर्डर ब्लॉक करण्यासाठी एक रुपया द्यावा लागेल. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी बाकीची रक्कम देऊन प्रोडक्ट खरेदी करता येवू शकते.⭕

Previous article*नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र*
Next article🛑 महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सुरू होणार शाळा, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here