🛑 ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक 🛑

0
28

🛑 ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 12 सप्टेंबर : ⭕ कोणत्याही डीटीएचचे रिचार्ज करणे एक मोठे काम आहे. डीटीएचचे रिचार्ज करणे मोबाइलच्या रिचार्ज करण्यापेक्षा कठीण काम आहे. कारण, यात बऱ्याचदा पॅक कळत नाही. ग्राहकांना अडचण येवू नये यासाठी टाटा स्कायने खास पाच बेस्ट प्लान आणले आहेत. हे पाचही प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान आहेत.

1) टाटा स्कायकडे पहिला पॅक हा Marathi Hindi Family Kids Sports HD आहे. या प्लानची किंमत ४७८.३० रुपये आहे. याची वैधता एका महिन्याची आहे. यात ग्राहकांना एचडी आणि एसडी दोन्ही प्रकारचे चॅनेल्स पाहायला मिळतील. ज्यात ४१ एचडी आणि ५० एसडी चॅनल्स आहेत. या पॅकमध्ये मराठी आणि हिंदीचे अनेक चॅनल्स पाहायला मिळतील. तसेच यात किड्स, न्यूज आणि म्यूझिक चॅनल्स आहेत.

2) दुसरा प्लानचे नाव Telugu Family Kids Sports HD आहे. याची किंमत ४४१.९६ रुपये आहे. या पॅकची वैधता एका महिन्याची आहे. हा प्लान मनोरंजन, स्पोर्ट्स, मूव्ही, किड्स आणि लाइफस्टाईल साठी परफेक्ट आहे. यात एकूण ३१ एचडी आणि ५० एसडी चॅनेल मिळतात.

3) तिसरा पॅक Kannada Family Kids Sports HD या नावाने आहे. याची किंमत ४०१.५१ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये जास्तीत जास्त कन्नड चॅनेल्स मिळतील. तसेच काही हिंदी चॅनेल्स सुद्धा आहेत. यात मूव्हीज, मनोरंजन, किड्स आणि स्पोर्ट्स चॅनलचा समावेश आहे. या प्लानमध्ये २८ एचडी आणि ४५ एसडी चॅनलचा समावेश आहे.

4) चौथा पॅक Telugu Malayalam Basic HD नावाने आहे. याची किंमत ३४३.४९ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. यात १९ एचडी आणि ४३ एसडी चॅनेल आहेत. यात जास्तीत जास्त तेलुगु आणि मल्याळम चॅनेल आहेत.

5) टाटा स्कायचा पाचवा व स्वस्त प्लानचे नाव Telugu Basic HD आहे. याची किंमत २०८.९८ रुपये आहे. यात तेलुगु सोबत हिंदी चॅनेल्स पाहायला मिळू शकतात. यात ११ एचडी आणि १५ एसडी चॅनेलचा समावेश आहे.⭕

Previous article🛑 व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार दोन नवीन फीचर्स 🛑
Next article🛑 *शरद पवारांकडून भाजपसह मनसेला धक्का….! दिग्गज नेत्यासह संपर्कप्रमुख राष्ट्रवादीत* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here