🛑 मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये….! ३ दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा 🛑

0
34

 

🛑 मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये….! ३ दिवसांत आक्रमक आंदोलनाचा इशारा 🛑
✍️ नाशिक 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नाशिक :⭕ मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे.

याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे.

या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर सरकारला 3 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. भूमिका स्पष्ट करा नाहीतर आंदोलन अटळ आहे अशी आक्रमक भूमिका क्रांती मोर्चा समनव्याकांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पार पडली महत्त्वाची बैठक

1) करणं गायकर (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

2) गणेश कदम (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

3) राजू देसले (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

4) माधवी पाटील (रणरागिणी, मराठा क्रांती मोर्चा)

5) पूजा धुमाळ (रणरागिणी, मराठा क्रांती मोर्चा)

दरम्यान, पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

तर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने सुरू असलेली 11 वी प्रवेश तात्पुरती स्थगित होणार आहे. पुढील शासन आदेशानंतर 11 वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. अकरावीची पहिली कटऑफ लिस्ट यापूर्वीच जाहिर झाली आहे तर दुसरी फेरी सुरू होती….⭕

Previous article🛑 अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर 🛑
Next article🛑 मराठा आरक्षणाच्या निकालात सुप्रीम कोर्टाचे कडक शब्द….! मराठा आरक्षणाची पुढील वाटचाल बिकट … ? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here