🛑 शेअर बाजारात विक्री ; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गडगडले 🛑

0
72

🛑 शेअर बाजारात विक्री ; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गडगडले 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 10 सप्टेंबर : ⭕ पत मानांकन संस्थांचा विकास दराबाबतचा नवा अंदाज, निराशावादी वातावरण यामुळे काल बाजारात सकाळपासून विक्रीचा सपाटा सुरु होता. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०० अंकांची घसरण नोंदवली. बाजार बंद होताना तो १७१ अंकांच्या घसरणीसह ३८१९३ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३९ अंकांची घसरण झाली. निफ्टी ११२७८ अंकांवर बंद झाला.

काल सकाळपासून बँका, टेलिकॉम, ऑटो, फार्मा, आयटी आदी क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. टेक महिंद्रा,टायटन, एचयूएल, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एसबीआय, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, एलअँडटी, टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी या शेअरमध्ये घसरण झाली. तर टाटा स्टील, रिलायन्स, इंडसइंड बँक, एशियन पेंट, मारूती, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअर तेजीसह बंद झाले. केंद्र सरकारने आयआरसीटीसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका आज आयआरसीटीसीच्या शेअरला बसला. आज आयआरसीटीसीचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला होता.

माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा क्षेत्रात असणाऱ्या हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेड या कंपनीने प्राथमिक बाजारात समभाग विक्री (IPO) करून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर ७५ टक्के अधिक दराने मिळत आहेत. तर आयपीओसाठी प्रती शेअर १६५ ते १६६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. कालपासून या इश्यूसाठी गुंतवणूकदारांनी ४२ पट बोली लावली आहे. या आयपीओतुन कंपनी ७०२ कोटींचा निधी उभारणार आहे.

दरम्यान , काल आशियात देखील सिंगापूर, हॉंगकॉंग, चीन, जपान या देशांमधील भांडवली बाजारात घसरण झाली. अमेरिकी बाजारातील घसरणीचे पडसाद आज आशियात उमटले. हँगसेंग ३२८ अंकांनी कोसळला. निक्केई २८४ अंकांनी घसरला. करोनाबाधितांची संख्या वाढत असून मृतांचा आकडा वाढत आहे. करोना अद्याप आटोक्यात न आल्याने अर्थव्यवस्थांचे मोठी नुकसान होण्याची भीती विविध पत मानांकन संस्थांनी व्यक्त केली आहे. नजिकच्या काळात करोनाच्या भयंकर संकटाला सामोरे जाण्याची तयार ठेवा असा इशाराच जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फिच रेटिंग्ज, इंडिया रेटिंग्ज तसेच गोल्डमन साक या तिन्ही संस्थांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढदर उणे राहिल, असे सांगितले आहे. फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास उणे १०.५ टक्के होईल, असे मंगळवारी सांगितले. याआधी फिचने आर्थिक विकासाचा अंदाज उणे ५ टक्के वर्तवला होता.⭕

Previous article🛑 भारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i 🛑
Next article🛑 संजय राऊतांचा राजीनामा घ्या; नवनीत राणा संतापल्या 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here