🛑 भारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i 🛑

0
31

🛑 भारतात १५ सप्टेंबरला लाँच होणार Redmi 9i 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 10 सप्टेंबर : ⭕ स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) Redmi 9i लाँच करण्याची घोषणा केली आहे. Redmi 9i स्मार्टफोन 15 सप्टेंबर रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये यूजर्सला वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले, 4GB रॅम आणि मिड-रेंज प्रोसेसर मिळेल. कंपनीने यापूर्वी Redmi 9 a, Redmi 9 आणि Redmi 9 Prime स्मार्टफोन भारतीय बाजारात बाजारात आणले होता.

Redmi 9i स्मार्टफोनचा लाँचिंग इव्हेंट १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार असून कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

➡️ Redmi 9i ची संभाव्य फीचर्स :-

समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, Redmi 9i स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये फोन लाँच केला जाईल. तसंच हा स्मार्टफोन नेचर ग्रीन, सी-ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. फीचर्सबद्दल बोलताना HD डिस्प्ले आणि मिड-रेंज चिपसेट या स्मार्टफोनमध्ये दिली जाऊ शकते. या फोनची बॅटरी आणि कॅमेर्‍याबद्दल माहिती मिळालेली नाही.⭕

Previous article🛑 कंगनाच्या मुंबईच्या कार्यालयाची तोडफोड 🛑
Next article🛑 शेअर बाजारात विक्री ; सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गडगडले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here