🛑 २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा…..! या नियमांचे पालन करणे अनिवार्य 🛑

0
40

🛑 २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा…..! या नियमांचे पालन करणे अनिवार्य 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.

गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे.

असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल.

– शाळांमध्ये कोणतीही अॅक्टीव्हिटी सुरू करण्यापूर्वी यामध्ये वर्ग, प्रयोगशाळा, सर्वजण वावरत असल्याचा परिसरात 1 टक्के सोडिअम हायपोक्लोराइट सॉल्यूशनने सॅनिटाइज करावा. सातत्याने स्पर्श होणाऱ्या भागात वारंवार सॅनिटायजेशन करावे.⭕

Previous article🛑 २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही…..! सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश 🛑
Next article🛑 कंगनाने पातळी सोडली….! मुखमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here