आजअखेर 19 हजार 325 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

0
31

आजअखेर 19 हजार 325 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर : आज आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 883 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 342 निगेटिव्ह तर 518 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह तर 21 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 775 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 627 तर 148 पॉझीटिव्ह (143 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 275 पॉझीटिव्ह आले असे एकूण 941 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 30 हजार 304 पॉझीटिव्हपैकी 19 हजार 325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 45 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 941 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-26, भुदरगड- 5, चंदगड-18, गडहिंग्लज-35, गगनबावडा- 2, हातकणंगले- 94, कागल-89, करवीर-90, पन्हाळा- 28, राधानगरी- 26, शाहूवाडी-44, शिरोळ- 43, नगरपरिषद क्षेत्र- 98, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 301 व इतर शहरे व राज्य 42 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-528, भुदरगड- 663, चंदगड- 671, गडहिंग्लज- 700, गगनबावडा- 80, हातकणंगले-3508, कागल-1032, करवीर-3271, पन्हाळा- 1073, राधानगरी- 810, शाहूवाडी- 681, शिरोळ- 1667, नगरपरिषद क्षेत्र-5109, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9601 असे एकूण 29 हजार 394 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 910 असे मिळून एकूण 30 हजार 304 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 30 हजार 304 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 19 हजार 325 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 934 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 45 इतकी आहे.

Previous articleकोल्हापूर शहरात जनता कर्फ्यु*
Next article🛑 कंगनाचं पुन्हा ट्वीट; राणी लक्ष्मीबाईंच्या पावलांनी मुंबई दाखल होण्याचे दिले संकेत… 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here