*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट

0
45

*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट।*
नाशिक,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्रक)- शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२०ची संध्याकाळ निसर्गरम्य अशा नाशिकचे काश्मीर, पावसाचे माहेरघर इगतपुरी येथे नेचर्स पॅराडाईज या प्रोजेक्टला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. खासदार श्री. संभाजीमहाराज भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय खताळे, शंतनू देशपांडे, सचिन खताळे, अँड. विनोद साळुंके, अविनाश वाळुंजे यांनी सुरू असलेल्या नेचर्स पॅराडाईज या प्रकल्पाची आणि इगतपुरी फोरमचे सुरू असलेले कार्य याची माहिती महाराजांना दिली.
महाराजांनी आपल्या अनेक आठवणी सर्वांना सांगितल्या. रायगडावर सुरू असलेल्या कामाची सर्वांना माहिती दिली.
महाराजांचे निसर्गप्रेम, पर्यटनाची आवड, पर्यटन वाढीसाठी सुरू असलेले कार्य, अनेक नवीन -जुन्या झाडांची माहिती त्यांच्या बोलण्यातून जाणवली. महाराजांनी त्यांनी काढलेले कोल्हापूर येथील निसर्गाचे फोटो, व्हिडिओ सर्वांना दाखविले आणि त्याची इत्यंभूत माहिती दिली. कधीही गरज पडल्यास मी उपलब्ध असेन अशी ग्वाही महाराजांनी दिली.
यावेळी महाराजांचे स्वागत करताना श्री. संजय खताळे, शंतनू देशपांडे, विनायक पाटील, विनोद साळुंखे, संजय शिंदे, सचिन खताळे, करण गायकर, गणेश कदम, सोमनाथ सोनार, अविनाश वाळुंजे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.

Previous article*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*
Next article*व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here