🛑 थेट टिव्हीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करणे शक्य 🛑

0
26

🛑 थेट टिव्हीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलिंग करणे शक्य 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 31 ऑगस्ट : ⭕ लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक नवीन व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स बाजारात आले. अनेक जुन्या अ‍ॅप्सने आपले फिचर अपडेट करत एकावेळी कॉल करणाऱ्यांची संख्या देखील वाढवली. मात्र आता लवकरच थेट टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग करणे शक्य होणार आहे. गुगल ड्युओ लवकरच अँड्राईड टिव्हीवर उपलब्ध होणार आहे. सध्या याचे टेस्टिंग बीटा व्हर्जनवर सुरू आहे. लवकरच हे फीचर उपलब्ध होईल.

अँड्राईड टिव्हीवर नवीन अपडेट आल्यानंतर आता स्मार्ट टिव्हीवरून व्हिडीओ कॉलिंग करता येईल. याआधी काही दिवसांपुर्वी गुगलने क्रोमकास्टमध्ये गुगल मीटचा सपोर्ट दिला होता. गुगलने आपल्या ब्लॉकमध्ये म्हटले की, मोठ्या स्क्रीनचा उपयोग केवळ मीटिंगसाठीच का, याचा वापर मित्र-कुटुंबाशी व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील व्हायला हवा.

गुगल ड्युओद्वारे अँड्राईड टिव्हीद्वारे युजर्स ग्रुप किंवा वन टू वन व्हिडीओ कॉलिंग करू शकतील. तुमच्या टिव्हीला कॅमेरा नसल्यास तुम्ही यूएसबी कॅमेऱ्याचा वापर करू शकता. याशिवाय कंपनी गुगल ड्युआला गुगल मीटसोबत रिप्लेस करण्याची देखील शक्यता आहे.⭕

Previous article🛑 ‘EMI’ स्थागिती संपुष्टात; निर्णय न झाल्याने कर्जदारांचा जीव टांगणीला 🛑
Next article🛑 परीक्षेचा निर्णय सोमवारी होणार; काय ठरलं कुलगुरूंच्या बैठकीत? 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here