🛑 देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र येणार….! उपमुख्यमंत्री अजित पवार 🛑

0
119

🛑 देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र येणार….! उपमुख्यमंत्री अजित पवार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे (पिंपरी) :⭕ प्रत्येक कोरोना रुग्णाला उपचार मिळावेत, बेड उपलब्ध व्हावा त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी एकत्र येत ही लढाई लढली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस व माझ्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन होणार असल्याने, आम्ही एकत्र येणार, ही ब्रेकींग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील येणार असल्याचे कोणाला माहीत झाले नाही.

अन्यथा त्यांचेही नाव त्यात आले असते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी या वेळी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले. उपमुख्यमंत्री पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, कोरोना हे मोठे संकट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यापेक्षा चूक लक्षात आणून देऊन काम केले पाहिजे. काळानुरूप काही पावले आपल्याला उचलावी लागली. कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोनाचे संकट गणरायाने दूर करावे, असे साकडे घालतो.

फडणवीस म्हणाले, राज्यात दररोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. यातील २० टक्के रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुणे जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढली. त्या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे.

महापालिकेने त्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी मिळून कोरोना विरूध्दची लढाई लढू या…..⭕

Previous article🛑 *बाणेरच्या कोविड सेंटरचे लोकार्पण !* 🛑
Next article🛑 पाकिस्तानात ७६ वर्षापासून…! मराठमोळे कुटुंब साजरा करत आहे…! गणेशोत्सव 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here