🛑 आता २८ ऑगस्टला…! मराठा आरक्षणावर सुनावणी 🛑

0
30

🛑 आता २८ ऑगस्टला…! मराठा आरक्षणावर सुनावणी 🛑

✍️ मुंबई ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई , २७ ऑगस्ट : ⭕ मराठा आरक्षणावर आज सुनावणी होणार होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल आणि मुकूल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. त्यावेळी, मराठा आरक्षण केस 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे द्यायला हवी, असं कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले. तर, इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवं, असे मुकुल रोहतगी यांनी म्हटले. त्यानंतर, न्यायालयाने पुन्हा तारीख देत, 28 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. मात्र, कोर्टाकडून तारीख पे तारख देण्यात येत आहे. या सुनावणीला आता 28 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुकूंद रोहतगी हे बाजू मांडत आहेत. आज झालेल्या सुनावणीत इंद्रा सहानी प्रकरणाचा दाखला देत मराठा आरक्षण प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मोठं खंडपीठ हवं, असं रोहतगी यांनी म्हटलं आहे.⭕

Previous article🛑 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय MPSC परीक्षाबाबात🛑
Next article*अमोल साळवे यांचे हदय विकाराने निधन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here