🛑 तुकाराम मुंढे यांची बदली….! भाजपा नगराध्यक्षां सोबतचा वाद भोवला 🛑

0
26

🛑 तुकाराम मुंढे यांची बदली….! भाजपा नगराध्यक्षां सोबतचा वाद भोवला 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ सत्ताधारी आणि प्रशासन याच्यात झालेल्या वादाच्या भोवऱ्यात अनेकदा सापडलेले नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सदस्य सचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील.

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

त्यात लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे, ए.बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे तर श्रीमती अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे.⭕

Previous article🛑 संपूर्ण माहिती एका क्लिकवर, स्टँड-अप इंडिया योजनेतून १ कोटीपर्यंतचं कर्ज कसं मिळवाल? 🛑
Next article🛑 पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here