🛑 *रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार*……! *- गृहमंत्री अनिल देशमुख* 🛑

0
32

🛑 *रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार*……!
*- गृहमंत्री अनिल देशमुख* 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अलिबाग,जि.रायगड :-⭕ रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.

मौजे तांबडी, तालुका रोहा येथील रणजित म्हांदळेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे म्हांदळेकर कुटुंबियांच्या घरी आले असताना बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले….🛑

Previous article🛑 मोठी बातमी…! रायगड महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली 🛑
Next article*अजमीर सौंदाणेत ग्रंथालय कार्यक्रम संपन्न*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here