🛑 कोकणात गणेशोत्सवाला गालबोट….! बाप्पाला निरोप देताना ३ जण बुडाले 🛑

0
96

🛑 कोकणात गणेशोत्सवाला गालबोट….! बाप्पाला निरोप देताना ३ जण बुडाले 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :⭕कोरोनाच्या परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून जिल्ह्यामध्ये तीन जण विसर्जन करताना बुडाली आहे.

यामध्ये रत्नागिरीजवळील टाकळी येथे काजळी खाडीत गणपती विसर्जन करताना सत्यवान पिलांकर 48 वर्ष व विशाल दिनकर वय 28 हे दोघेजण बुडाले होते. स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खाडीमध्ये वाहून गेले. त्यामुळे उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता.

तसंच दीड दिवसांचा गणेश विसर्जनाच्या वेळी मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे विसर्जन करतेवेळी 28 वर्षांचा युवक बुडाला व बेपत्ता झाला.

या युवकाचे नाव अविनाश शिगवण असे आहे. हा प्रकार गदा पुलानजीक घडला युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र, अजूनही तो आढळून आला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जन करताना तीन जण बुडाली आहेत. मात्र, अजून पर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे ते जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झाला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. बेपत्ता तरुणांचे शोध कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, सकाळपर्यंत कुठेही ते आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.

यावर्षी कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा होत आहे. विसर्जन सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, कृत्रिम ठिकाणी विसर्जन न करता सालाबाद प्रमाणे हाडी नदी व तलावात विसर्जन ग्रामीण भागात करण्यात येत होते त्यातूनच हा प्रकार घडला आहे….⭕

Previous article*इचलकरंजी शहर बागवान जमियत यांच्या वतीने १०, १२ वी. च्या परिक्षेत* *उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.*
Next article🛑 पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here