🛑 राज्यात दिड दिवसांच्या बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन 🛑

0
25

🛑 राज्यात दिड दिवसांच्या बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 24 ऑगस्ट : ⭕ गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया… पुढच्यावर्षी लवकर या… अशा जयघोषात रविवारी राज्यात दिड दिवसांच्या लाडक्या बाप्पाचे भक्तीभावात विसर्जन करण्यात आले. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर शहरासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शांततेत बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे. शनिवारी उत्साहात गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन झाले होते. तर रविवारी दिड दिवसांच्या बाप्पांचे भक्तीभावात विसर्जन करण्यात आले.

दरवर्षी गणपती आगमनावेळी आणि विसर्जनावेळी मिरवणूक, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. मोठ्या धूमधडाक्यात बाप्पांची आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत विसर्जन मिरवणूका न काढता बाप्पांना भक्तीभावाने निरोप देण्यात आला. राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here