*समाजाच्या सेवेसाठी ताकदीने उतरण्याचा निर्णय ,पंकजा मुंडे*

0
33

*समाजाच्या सेवेसाठी ताकदीने उतरण्याचा निर्णय ,पंकजा मुंडे*

*कोल्हापूर प्रतिनीधी युवा मराठा न्युज*

भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे
गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून लांब असल्याने पुन्हा नव्याने ‘राजकीय इनिंग’ सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. करोना संकट दूर झाल्यावर, जनजीवन सुरळीत झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे, ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय गणपती पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
एक फेसबुक पोस्ट द्वारे बऱ्याच कालावधी नंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावे लागणार आहे. तेव्हा त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यानंतर पंकजा मुंडे पक्षात फारशा सक्रीय दिसल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी डिसेंबरला पंकजा मुंडेंनी शक्तीप्रदर्शन केलं. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेही उपस्थित होते. याच कार्यक्रमातून खडसेंनी भाजपवर थेट टीका केली होती. एकनाथ खडसेंबरोबरच पंकजा मुंडेदेखील पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती.
भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या राज्याच्या कार्यकारिणीमध्येही पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलं नाही. पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे, तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

Previous article*भारताचा क्रिकेट पट्टू सुरेश रैनाने मानले मोदींचे आभार*
Next article*शिरोळ तालुक्यात रोहीत शर्मा विरूद्ध धोनीच्या पोस्टरवरून वाद*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here